दिंडोरी: वरखेडा येथे उद्या छत्रपतींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
दिंडोरी तालुक्यात वरखेडा येथे उद्या 3 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, निफाडचे आमदार दिलीप बनकर, विधान परिषद चे आमदार अमोल मिटकरी, कळवणचे आमदार नितीन पवार यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे.