मोखाडा: हनुमान जयंती निमित्त सायदे येथे कार्यक्रमाचे आयोजन; पंचायत समिती उपसभापतींनी हनुमान मंदिरास भेट देत घेतले दर्शन
मोखाडा तालुक्यातील सायदे येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान मंदिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी हनुमान जयंती निमित्त सायदे येथील हनुमान मंदिर येथे भेट देत हनुमानाचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने यावेळी उपसभापतींचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवर, नागरीक उपस्थित होते.