राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत शेगी, रामगड दाभाडी, चिंचखेडा येथे तपासणी शिबीर संपन्न
1.5k views | Mangrulpir, Washim | Sep 14, 2025 वाशिम (दि.१२, सप्टेंबर): राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्रा.आ. केंद्र आसेगाव अंतर्गत आशाताईंनी शोधलेल्या संशयित रुग्णांची तपासणी शेगी, रामगड दाभडी व चिंचखेडा येथे करण्यात आली. एकूण 27 रुग्णांची तपासणी करून 2 रुग्णांना MDT उपचार सुरू करण्यात आले असून, एक रुग्ण SSS करीता अकोला मेडिकल कॉलेजला संदर्भित करण्यात आला. त्यावेळी तपासणी करिता जिल्हा स्तरावरून, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातील अवैद्यकीय पर्यवेक्षक श्री ए. एस. लोणारे, सनगाव उपकेंद्राचे CHO श्री गजानन ठाकरे, गटप्रवर्तक मंगला सावळे आणि संबंधित आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.