सेनगाव: राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरळ ओकून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, शेतकरी नेते मारोती गीते
शेतकरी नेते मारोती गीते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे तसेच आधी कर्ज काढायचं व कर्जबाजारी होऊन पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांबद्दल गरळ ओकली असुन या घटनेचा शेतकरी नेते मारोती गिते यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याचे केल्याची खंत शेतकरी नेते यांनी व्यक्त केली.