नागपूर ग्रामीण: सुरेंद्र स्प्रिंग कंपनीला लागली आग, तेलाच्या दोन ड्रमचा झाला विस्फोट,सुदैवाने जीवितहानी नाही
सुरेंद्र स्प्रिंग कंपनीला आज १४ ला दुपारी ४ वाजताच्या सूमारास अचानक आग लागली. सदर कंपनी अशोक गर्ग यांच्या मालकीची आहे. दुपारी अचानक ऑइल च्या ड्रम ला आग लागली आणि काळ्याभोर धुराचे लोट परिसरात पसरले. कंपनीत असलेल्या तेलाचे दोन ड्रमचा विस्फोट झाला. त्यामुळे आग सर्वत्र पसरली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.