जालना: नौतपाचा तडाखा वाढला; नागरिकांनी काळजी घ्या -- डॉ.भागवत काळे यांचा सल्ला
उष्माघात, डिहायड्रेशनचा धोका वाढला; पाणी, विश्र
Jalna, Jalna | May 27, 2026 नौतपाचा तडाखा वाढला; नागरिकांनी काळजी घ्या -- डॉ.भागवत काळे यांचा सल्ला उष्माघात, डिहायड्रेशनचा धोका वाढला; पाणी, विश्रांती आणि योग्य आहार महत्त्वाचा आज दिनांक 27 सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यासह जालना जिल्ह्यात सध्या ‘नौतपा’चा प्रभाव तीव्र होत असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सकाळपासूनच कडक ऊन आणि दुपारी उष्णतेची लाट नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात आणि डिहायड्रेशनसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण