प्रतिष्ठेची “विश्वास करंडक” तीन दिवसीय बालनाट्य स्पर्धा 11 ते 13 डिसेंबरदरम्यान प्रमिलाताई ओक हॉल येथे होणार आहे. विदर्भातील 30 शाळांची नाटके सादर होणार असून रोज सकाळी 9 पासून सादरीकरणे सुरू होतील. उद्घाटन रुद्र कुकडकर व अनया कुऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. परीक्षक म्हणून गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे व यतीन माझिरे कार्य पाहतील.समारोप व बक्षीस वितरण सोहळा 13 डिसेंबर रोजी सायंकाळी होणार असून तो मूळचे अकोल्याचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे परीक्षक व चित्रपट विभाग, भारत सरकारच