जालना: तत्पर तरुणाच्या सतर्कतेने मोती तलावात उडी मारणार्या तरुणीचा जीव वाचला; चंदनझीरा पोलीसांची घटनास्थळी धाव
Jalna, Jalna | May 5, 2026 जालना शहरातील मोती तलाव परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सतर्क तरुणाच्या प्रसंगावधानामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या तरुणीचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात त्या तरुणाचे कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,दि.5 मे 2026 रोजी दु.सुमारे 2.30 वाजेच्या सुमारास एक तरुणी आत्महत्येच्या उद्देशाने मोती तलाव परिसरात आली होती.तलावाकडे संशयास्पद हालचाली करत जात असताना एका तरुणाच्या ती बाब लक्षात आली.त्याने तत्काळ तिच्या मागे धाव घेत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला.