नागपूर ग्रामीण: नागपूर जिल्ह्यात विकासकामांना गती द्या; प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, सिलिंग जमिनींसंदर्भातील कार्यवाही, सन २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना, झुडपी जंगल जमिनींसंदर्भातील प्रकरणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ अंतर्गत प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. सं