प्रजासत्ताक दिन शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, या दृष्टीने काटोल पोलिसांनी कंबर कसली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ५६ सराईत आरोपींची शनिवारी पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली.२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.