भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदारसंघ नोंदणीवर सभा व पत्रकार परिषद संपन्न
भंडाराचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीबाबत एक महत्त्वपूर्ण सभा व पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मतदार नोंदणी प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि आवश्यक कागदपत्रे यावर मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, तर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली.