सेनगाव: देवघरातील दिव्यामुळे साठवण करून ठेवलेल्या कापसाला लागली आग, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
आडोळ येथील शेतकरी भगवान चव्हाण यांच्या राहत्या घरी वेचणी करून आणलेल्या कापूसाला आग लागून नुकसान झाल्याची घटना आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. भगवान चव्हाण यांच्या घरामधील देवपूजे नंतर देव्हाऱ्यामध्ये ठेवलेल्या दिव्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या कापसाला अचानक आग लागली. यावेळी काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली यामध्ये जवळपास 4 ते 5 क्विंटल कापूस जळून नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.