चिखलदरा: पो.स्टे.हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार;पीडिता गर्भवती,चिखलदरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
चिखलदरा तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची गंभीर घटना सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी १:४९ मिनिटांनी उघड झाली आहे.पीडिता गर्भवती झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला असून चिखलदरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,१६ डिसेंबर २०२४ मध्ये दत्त जत्रेत पीडित व आरोपी दिपक श्रीकृष्ण काळे वय वर्ष २२ रा.वडापाटी ता. चिखलदरा यांची ओळख झाली.