भद्रावती: तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर.
न्यायालयाचा आदेश असतांनाही शेतीचे फेरफार करण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने हवालदिल झालेल्या परमेश्वर ईश्वर मेश्राम या ५५ वर्षीय शेतकऱ्याने भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.सदर शेतकऱ्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आता त्यांची प्रकृर्ती ठिक असुन ते धोक्याबाहेर असल्याचे ठाणेदार पारधी यांच्याकडून सांगण्यात आले.