चंद्रपूर येथे दि. २१,२२,२३ नोव्हेंबर रोजी जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात आज दि २१ नोव्हेंबर ला ४ वाजता चंद्रपूर नगरीतून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील महिला चंद्रपुरात मोठ्या संख्येने दाखल झाल्या. या सर्व महिलांनी शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन धुमधडाक्यात अधिवेशनाची सुरुवात केली. ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आणि तेथून या शोभायात्रेची सुरुवात झाली.