हातकणंगले: कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, मृत कुटुंबीयांना २५ लाखांची मदत जाहीर
कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार (वय ५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.सायंकाळी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास सुभेदार हे रामेवाडी येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले असता सरस्वती सुतार यांच्या उसाच्या शेतातून अचानक एक रानगवा बाहेर येत त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शिंग घुसल्याने सुभेदार गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.