सातारा: संविधान जागर कार्यक्रमाची प्रसिद्ध न केल्याबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सामाजिक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Satara, Satara | Sep 30, 2025 दिनांक 29 सप्टेंबर रोजी, सातारा समाज कल्याण विभागामार्फत संविधान जागर हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमातून भारतीय संविधानाची माहिती व जागरूकता निर्माण करण्याची होती, परंतु शासनाच्या वतीने सदर कार्यक्रमाची कोणतीही योग्य नियोजन न केल्याने, सामान्य प्रेक्षक वर्गाचा सहभाग अत्यंत कमी प्रमाणात राहिला, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.