नागपूर ग्रामीण: लोणारात सरपंचांच्या घराला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
लोणारा येथील मोटकर ले-आउटमध्ये आज सकाळी ६:३० च्या सुमारास सरपंच राजेंद्र ढेपे यांच्या घराला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच सुगतनगर अग्निशमन दलाने १८ मिनिटांत पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले.या आगीत घरातील सेंट्रिंग प्लाय, टेबल आणि खुर्च्या जळून सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण घर वाचवण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली.