तुमसर तालुक्यातील मोहाडी खापा ते सोंड्या रस्त्यावर दि. 26 डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी 6 वा.च्या सुमारास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर व त्यातील दोन ब्रास रेती असा एकूण 14 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी ट्रॅक्टर चालक सुरेंद्र शरणागात व ट्रॅक्टर चालक मनीष भलावी यांच्या विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.