चांदूर रेल्वे: वीरगव्हाण येथे अकरा वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात इसमाने पळून नेल्याचा संशय ;आढळल्यास कुऱ्हा पोलिसात कळवण्याचे आवाहन
विजय रमेश राठोड वय वर्ष 31 राहणार वीरगव्हाण यांनी कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे . धूप विजय राठोड वय वर्ष 11 हा घरातून खेळायला गेला असता घरी परतला नाही .शोध घेतला असता मिळून आला नाही .कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेले अशा ची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. रंग गोरा ,उंची चार फूट, बांधासळ पातळ ,चेहरा लांब, डोळे मोठे, केस काळे भुरकट ,लाल रंगाची टी-शर्ट घातलेला वर्णाचा मुलगा हरवला आहे .आढळून आल्यास कुऱ्हा पोलिसात कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.