जावळी: प्रति पंढरपूर करहर येथे आषाढी एकादशी साजरी; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती
Jaoli, Satara | Jul 6, 2025 आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर, ता. जावली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची रविवारी सकाळी साडेसात वाजता महापूजा करण्यात आली. जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव अशी प्रार्थना मंत्री भोसले यांनी विठ्ठलचरणी केली.