कवठे महांकाळ: विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रायवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक गाडीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू
विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रायवाडी गावच्या हद्दीत टाटा एस मालवाहतूक गाडीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नागज (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील बाळासाहेब शिंदे (वय ५९) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते जागीच ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागज येथून टाटा एस कंपनीची मालवाहतूक छोटा हत्ती गाडी (क्र. एमएच-६८) घेऊन घाटनांद्रे गावच्या दिशेने जात असताना रायवाडी गावच्या हद्दीतील घाटात