जळगाव: कुसुंबा गोळीबार प्रकरणातील ५ संशयित आरोपींची सुप्रिम कॉलनीतून काढली धिंड; एमआयडीसी पोलीसांची कारवाई
कुसुंबा गावात चंद्रशेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार केल्याच्या गंभीर घटनेतील पाच संशयित आरोपींना अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना सुप्रीम कॉलनी परिसरातून फिरवण्यात आले.