नागपूर शहर: मेहंदी बाग पुलिया येथे ट्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू
9 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मेहंदी बाग पुलिया येथे ट्रेनच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या महिलेचे वय 40 वर्ष असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कबीर वर्मा यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.