दर्यापूर: संगत संस्थान येथे काकडा आरतीची भव्य समाप्ती; दिमाखदार मिरवणुकीने वेधले लक्ष
संगत संस्थान येथे पारंपरिक उत्साहात साजरी होणाऱ्या काकडा आरतीचा समारोप आज दुपारी १ वाजता मोठ्या जल्लोषात पार पडला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.मिरवणुकीत दिंडी पथक,ढोल पथक,तसेच मुखवटा धारी हनुमान,मगरध्वज,गणपती,ताटका यांच्या आकर्षक वेशभूषेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शहरातील तेलीपुरा, सावकारपुरा,काठीपुरा,बालाजी चौक,ओम चौक,शनिवार पेठ,पान अटाई मार्गे विठ्ठल मंदिर ते संगत संस्थान येथपर्यंत काढण्यात आली.