टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गाडीचा कट लागल्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. एकमेकांना अर्वाची भाषेत शिवीगाळ करत मिळेल त्या वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश होता. त्यानंतर टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून दोन्ही गटातील एकूण आठ जणांवर टिटवाळा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे