कोशिश फाउंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर चषक वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेत श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक ६, धाकटा खांदा येथील सात विद्यार्थ्यांनी तर जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा क्रमांक ५, मोठा खांदा येथील एका विद्यार्थ्याने उत्तम कामगिरी करीत पारितोषिके मिळवून शाळेचा आणि पालकांचा मान उंचावला.