वडवणी: डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्यायासाठी कपडगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचे शोले स्टाईल आंदोलन
Wadwani, Beed | Oct 30, 2025 बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आज तरुणांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन छेडले. आंदोलकांनी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून या घटनेचा तपास व्हावा, अशी ठाम मागणी केली आहे. या आंदोलनस्थळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेत न्याय मिळवण्यासाठी ठामपणे पाठिंबा दर्शवला. संपदा मुंडे प्रकरणाचा तपास यो