तिरोडा: तिरोडा बस स्टॉप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने वासराला दुखापत
Tirora, Gondia | Sep 19, 2025 तिरोडा शहरातील बस स्टॉप समोरील गजभिये पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वासराला गंभीर दुखापत झाल्याची घटना १९ सप्टेंबरच्या पहाटे घडली. या घटनेत वासराच्या तोंडाला आणि नाकाला जबर मार लागला. याची माहिती पोलीस स्टेशन तिरोडा येथे देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरांना बोलविले. घटनास्थळी डॉक्टर उपस्थित झाले व त्यांनी जखमी वासराची पाहणी करून त्याच्यावर उपचार केले व त्यानंतर वासराला सोडून देण्यात आले.