मारेगाव: तहसील कार्यालयात पार पडली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आरक्षण सोडत सभापतीपद सर्वसाधारण राखीव
पंचायत समितीच्या 4 गणाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात सोडत पद्धतीने काढण्यात आली. यामध्ये 2 ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने अनेकांचे मनसुबे हवेत विरल्याचे चित्र यावेळी पाहण्यास मिळाले. तर जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा महिला राखीव निघाल्या. त्यामुळे स्थानिक प्रशासनात महिला राज येणार असल्याने अनेक पुरुष उमेदवारांचे स्वप्न हवेत विरले.