चंद्रपूर: पक्षी सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम
पक्षी सप्ताहाच्या सहाव्या दिवशी आज दि 10 नोव्हेंबर 11 वाजता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्रांमध्ये पक्षी निरीक्षणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कोळसा परिक्षेत्राच्या सीमेवरील झरी व पांगडी येथील इको विकास समितीच्या सदस्यांसोबत पक्षी या विषयावर संवाद साधण्यात आला.ताडोबा परिक्षेत्रात काटेझरी पाणस्थळ आणि ताडोबा तलाव येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले.