मेडीकलवर औषधी घेण्यासाठी गेलेल्या दीपक रमेशचंद गगराडे (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.