गगनबावडा तालुक्यात जांभुर्डे वाडीत मोटारसायलचा अपघात : तरुण गंभीर जखमी.
गगनबावडा तालुक्यातील जांभुर्डे वाडी येथे मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. मोटरसायकलने संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिल्याने या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील कवळी गावचा कुमार कंकणवाडी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.आज बुधवार 2 जुलै दुपारी तीन वाजता गगनबावडा पोलिसांतून ही माहिती मिळाली.