महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान त्यांचा 25 नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये तेल्हारा अकोट हिवरखेड या तीन नगर परिषदेच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत. या प्रचार दरम्यान २५ हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती या जाहीर सभेला असणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.