पाचोरा: पाचोर्यातून निघाली बस मोहळाई पोहचली, गावाच्या ईतिहासात पहिल्यांदाच एस.टी.बसचे दर्शन, केले जंगी स्वागत,
मोहळाई गावाच्या ईतिहासात पहिल्यांदाच एस.टी.बसचे दर्शन. मोहळाई या गावातील ग्रामंस्थांसह विद्यार्थी आणि प्रवाशांना आज दि.16 आक्टोंबर 2025 रोजी पहिल्यांदाच एस.टी.बसचे दर्शन झाल्याने ग्रामंस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांकडून मोहळाई गावात एस.टी.बसचे सकाळी 10 वाजता जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी युवा कार्यकर्ते हर्षवर्धन रावसाहेब पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून नवीन बसचे स्वागत करण्यात आले.