अकोला: आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे होणार गोवर- रूबेला लसीकरण,जिल्हाधिकारी मीना यांची माहिती
Akola, Akola | Sep 16, 2025 जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत राबवली जाईल. एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिले आहेत. लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आरती कुलवाल, आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे, डॉ. विनोद करंजीकर आदी उप