आज दिनांक 8 डिसेंबर सकाळी आठ वाजता अहिल्यानगरजवळ आज पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पुणे–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ई-बसचा भीषण अपघात झाला. बसचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. या धडकेत बसचा खाजगी चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.