छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे गड–किल्ले आजही दुर्लक्षित अवस्थेत आहेत. ऐतिहासिक वारशाची होत असलेली ही दुरवस्था मन सुन्न करणारी असून, गड संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचा ठाम निर्धार खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. खासदार लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ‘आपला मावळा’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गड संवर्धन, जतन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचा दहावा टप्पा संपन्न झाला