हडपसर परिसरातील हांडेवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या पाईपलाइनच्या कामामुळे मोठे खड्डे पडले आहेत. आज सकाळी सुमारे ११ वाजता एका बसने या खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री साडे सातच्या सुमारास बसला बाहेर काढण्यात यश आले.