राज्य निवडणूक आयोगाने पूरविलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचना यांवर कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली युध्दपातळीवर काम करते आहे.या कामासाठी महापालिकेने प्रभाग निहाय नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नियंत्रण अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवरती महापालिकेकडे सुमारे 29 हजार 423 हरकती प्राप्त झाल्या असून यातील बहुतांश हरकती या दुबार मतदारांबाबत आहेत. सदर दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या 29 ऑक्टोबर 2025 सूचनांनूसार बीएलओंच्या मार्फत समक्ष चौकशी करून कार्यवाही करण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर केलेल्या कार्यवाहीनुसार