शहरातील गांधी चौकातून बिरसा मुंडा यांच्या १५० जयंती निमित्त आज दि.१५ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्याल्याच्या समोरील बिरसा मुंडा पुतळ्या पर्यंत काढण्यात आली शोभायात्रा. सदर शोभा यात्रेत आदिवासी बांधव, तसेच मुला मुलींनी पारंपारिक नृत्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी बिरसा मुंडा यांची रथ यात्रा ही नाचत गाजत काढण्यात आली. यावेळी सदर शोभायात्रेत आदिवासी महिला, पुरूष व अनेक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.