गंगाखेड: गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आ. गुट्टे यांनी प्रशासनाला दिले आदेश
गंगाखेड तालुक्यासह पूर्ण मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्याशी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास आमदार रत्नाकर गुट्टे हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच सरसकट पंचनामे करा आणि शेतकरी बांधवांना दिलासा द्या, असे आदेश दिले.