जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ असलेल्या हॉटेल सावन समोर दुचाकीने जात असलेल्या तरूणाला समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक देवून गंभीर दुखापत केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.