जालना: कारवाईनंतर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक गायब?; नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
Jalna, Jalna | Jun 28, 2026 जालना शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. मंठा चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईची मोठी प्रसिद्धीही करण्यात आली होती. मात्र, त्या कारवाईनंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक शहरात कुठेही सक्रिय दिसत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागांवर पुन्हा अतिक्रमणे वाढत असल्याचा आरोप नागरिकांक