वर्धा: सेवा पंधरवड्यात नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Sep 17, 2025 सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जिल्ह्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या पंधरवड्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी केले. विकास भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित सेवा पंधरवड्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत हो