भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान हाती आला असून, भंडारा नगरपरिषदेत एकूण ३५ जागांपैकी तब्बल २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकहाती सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५ जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे, तर विरोधातील काँग्रेसला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे भंडारा शहरात भाजपचा बोलबाला पाहायला मिळत आहे.