मानगाव: नांदवी शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदवी येथे उद्योजक संलग्न अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ..
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदवी ता. माणगाव, जि. रायगड येथे दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता “उद्योजक संलग्न नवयुवकांसाठी अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा” शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी (Online) पद्धतीने नवी मुंबई येथून झाले.