कामठी: वाहतूक पोलिसाला घेऊन पळाला मद्यधुंद बाईकस्वार; आशा हॉस्पिटल परिसरातून घेतले ताब्यात
हिंगोली येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय तुळशीराम गिरी या युवकाला कलमना टी-पॉईंटजवळ वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता, तो दारूच्या नशेत असल्याचे आढळले. हा युवक कन्हानहून नागपूरच्या दिशेने जात होता. वाहतूक विभागाच्या एका शिपायाने तुळशीरामला त्याच्या दुचाकीवर कार्यालयात घेऊन जाण्यासाठी मागे बसण्यास सांगितले. मात्र, कार्यालयाच्या दिशेने न जाता, तुळशीरामने शिपायाला घेऊन दुचाकी भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळवली.