उत्तर प्रदेशातील एका तरुणाला नागपुरातील अल्पवयीन प्रियसी वर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली त्या युवकाने चक्क पोलीस ठाण्यातील लॉक अप मध्ये चादरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना 22 जानेवारी ला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. नागेंद्र कुमार भाटिया असे या मृतकाचे नाव सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागेंद्र कुमार हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील असून इंस्टाग्राम वर त्याची सोळा वर्षीय मुलीशी प्रेम संबंध झाले होते.