जालना: जालना रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रविवारी पुन्हा एकदा भीषण ट्रॅफिक जाम; वाहतुक व्यवस्था खोळंबली
Jalna, Jalna | Oct 12, 2025 जालना शहरातील रेल्वे स्टेशन ते गांधी चमन आणि मंम्मदेवी रोड मार्गावर रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पुन्हा एकदा भीषण ट्रॅफिक जाम पहायला मिळाला. आठवडी बाजारामुळे या परिसरातील नागरिक, प्रवासी, तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या जाममुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रस्त्यावर रुग्णवाहिका अडकून पडतात, त्यामुळे रुग्णांचे जिव देखील धोक्यात आलेत. रुग्णांप्रमाणेच सामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. दर रविवारी हा आठवडी बाजार भरतो.